bhaji vikri 
मुंबई

कशासाठी पोटासाठी! आदिवासी महिलांकडून महामार्गावर रानभाज्या, फळभाज्यांची विक्री

महेंद्र पवार

कासा : डहाणू, तलासरी तालुक्‍यातील ग्रामीण आदिवासी भागातील नागरिक पूर्वी उदरनिर्वाहासाठी शहरातील विविध कारखान्यात मिळेल ते काम करत असत. अनेक नागरिक वीटभट्टी, गवत कापणे, ट्रकवर हमाल अशी विविध कामे करत होते; परंतु गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शहरातील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांसमोर पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

परंतु खचून न जाता या भागातील आदिवासी महिलांनी पोटापाण्यासाठी धडपड सुरू केली आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद झाल्याने आदिवासी महिलांनी खचून न जाता आपल्या शेतातील, जंगलातील भाजीपाला, फळभाज्या, जंगली भाज्या, काकडी महामार्गावरील मोकळ्या जागेवर विकायला सुरुवात केली आहे. 

घरगुती विनाखताची भाजी, फळे घेण्यासाठी महामार्गावरून जाणारे प्रवासी गर्दी करत आहेत. कारण हायब्रीडच्या जमान्यात घरगुती पद्धतीने पिकवलेली फळभाजी घेण्यासाठी हे प्रवासी पसंती देत आहेत. महामार्गावरील चारोटी ते आंबोली या भागात अनेक आदिवासी महिला आपले छोटे दुकान लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाज्या, फळे विकण्यासाठी बसत आहेत.  यात वाड्या मधील नारळ, गावठी केळी, चिकू, पेरू, काकडी, सीताफळ, दुधी, कारले, रानभाज्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. यामुळे निदान पोटापाण्याचा प्रश्न सुटत आहे. 

आम्ही या दिवसांत भातकापणी करत आहोत; मग पैसे कमावण्यासाठी दुसरे कोणतेही काम नाही. शहरात काम मिळत नाही. त्यामुळे घरगुती भाज्या, रानभाज्या, फळे विकायला येथे येत असून या महामार्गावरून मोठी, लहान वाहने थांबून आमच्या फळभाज्या, रानभाज्या, फळे विकत घेत असून त्यातून आम्हाला चांगले पैसे मिळत आहेत. 
- गीता ओझरे, भाजीपालाविक्रेती महिला 

(संपादन : वैभव गाटे)

Sale of fruits and vegetables on the highway by tribal women

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last call Shrijit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित दादांनी शेवटचा कॉल केलेले श्रीजीत पवार कोण?

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, टोल वसूल करताय पण सुविधा देणार कोण?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

IT Stock Crash : अमेरिकन कंपनीच्या भीतीने TCS, Infosys सोबत या IT कंपन्यांचे शेअर्स कोसळले! काय आहे कारण?

Content Creator Labs : कॉलेजमध्ये शिकता-शिकता करा लाखोंची कमाई! मिळणार 'क्रिएटर' बनण्याचे सर्टिफिकेट, Netflix अन् Google स्वतः देईल जॉब

SCROLL FOR NEXT