Salman Khan sakal
मुंबई

Salman Khan: थापनच्या मृत्यूची चौकशी करा, कुटुंबीयांची मागणी, उच्च न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केली. त्यानंतर अनुजचा मृत्यू संशयास्पद असून याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अनुजच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली आहे. पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही दिवसांपूर्वी दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भूजमधून अटक केली तर अनुज थापन आणि सोनू बिश्नोईला पंजाब येथून अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अनुजने बुधवारी तुरुंगातच चादरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला व त्यातचा त्याचा मृत्यू झाला.

अनुजच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल सादर केला तेव्हा गळ्याभोवती चादर गुंडाळल्याने झालेले व्रण व श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

SCROLL FOR NEXT