salman khan firing esakal
मुंबई

Salman khan Firing: जेलमध्ये जीवन संपवलेल्या अनुजचा पोस्टमार्टम अहवाल अपुरा? राज्य सरकारवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

अनुज याचा मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केली असून अपुऱ्या शवविच्छेदन अहवालावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

आरोपीने गळफास लावून घेतला त्याचा खुणा दर्शवणारे आकृतीबंध शवविच्छेदन अहवालात कुठे आहेत? हा शवविच्छेदन अहवाल तुम्हाला अर्धवट वाटत नाही का असा सवाल न्यायालयाने सरकारला केला.(ajun thapan salman khan home case)

अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केली मात्र अनुज याचा मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत अनुजच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुट्टी कालीन न्यायालयाचे न्या.नितीन बोरकर व न्या. सोमसेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर आज (ता.२२) यावर सुनावणी घेण्यात आली.

शवविच्छेदन अहवालातील त्रुटी पाहून न्यायालयाने सरकारला फटकारले तेव्हा सरकारच्या वतीने ऍड जे पी याग्निक यांनी युक्तिवाद करताना सांगितले की तपास पथक संबंधित वैद्यकीय पथकाशी संवाद साधेल. दरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्याची परवानगी दिली.

सुनावणीवेळी अभिनेता सलमान खान याच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी याचिकेतील पक्षकार म्हणून सलमान खान यांचे नाव वगळण्याची मागणी केली त्यांनी न्यायालयाला सांगितले की सलमान खान यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असे असताना प्रतिवादी म्हणून त्यांना या प्रकरणात ओढणे चुकीचे आहे त्यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा खराब होत आहे.

याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की सलमान खान यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची त्यांची मागणी नाही याचिकेतील एका टायपोग्राफिकल चुकी मुळे त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी खंडपीठाने त्यांना तशी परवानगी दिली. तसेच अनुज याच्या मृत्यूबाबत दंडाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करण्यास सांगत सुनावणी जूनपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT