Salman Khan sakal
मुंबई

Salman Khan: सलमानला यु ट्यूब चॅनलवरून धमकी, राजस्थानहून तरुणाला केली अटक!

Mumbai: व्हिडिओ एका चाहत्याने पाहिला आणि पोलिसांना कळविले. मग पोलिसांनी कारवाई केली

सकाळ वृत्तसेवा

Bollywood : यु ट्यूब चॅनलवरून अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने राजस्थान येथून अटक केली. बनवारीलाल गुजर(२५) असे या तरुणाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी 'अरे छोडो यार' या युट्यूब चॅनेलवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओत बिश्नोई टोळीचे गोल्डी ब्रार आणि इतर सदस्य आपल्यासोबत असून सलमानला मारण्याचा बेत ठरला आहे. सलमानला कोणत्याही दर्जाची सुरक्षा द्या, त्याला आम्ही सोडणार नाही, अशी धमकी बनवारीलाल देत होता. हा व्हिडिओ एका चाहत्याने पाहिला आणि पोलिसांना कळविले.

याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आला.

तांत्रिक पुराव्यांआधारे आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांचे पथक मुंबईहून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. राजस्थानच्या बुंदी गावातील गुजर हॉस्टेलमधून बनवारीलाल याला ताब्यात घेत मुंबईत आणून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : 'बजेट' शब्द कुठून आला? सकाळी 11 वाजताच बजेट का सादर केलं जातं? जाणून घ्या बजेटविषयी महत्तवाच्या गोष्टी

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव यांनी संजू सॅमसनची मदत करायला हवी! अजिंक्य रहाणेची विनंती; म्हणाला, त्याला एकटं पाडू नका...

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात डोनाल्ड ट्रम्प यांचाच खोडा, लीक ऑडियो क्लिपमध्ये धक्कादायक खुलासा

Chandra Shani Yog 2026: धक्का देणारा ग्रहयोग! 27 जानेवारीला चंद्र–शनी दृष्टीमुळे वृषभसह ‘या’ 2 राशींची परीक्षा

SCROLL FOR NEXT