मुंबई

आदित्य ठाकरेंच्या बंगल्याबाहेर संभाजी ब्रिगेडची घोषणाबाजी

संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती.

सुमित सावंत

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड (Sambhaji brigade) संघटनेनं आंदोलन (protest) केलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण (obc reservation) आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती. पण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Sambhaji brigade protest ouside aditya thackeray bunglow)

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. यावेळी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे.

काय आहेत मागण्या?

1) मराठा समाज व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे.

2) सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांचा रखडवलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात.

3) मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे.

4) सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.

5) मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

Rishabh Pant: रिषभ पंतला उपकर्णधारपदाचा फटका? निवड समिती घेणार मोठा निर्णय

Nagpur News: प्रेमविवाहानंतर १२ वर्षे संसार, पत्नी दुसऱ्यासोबत गेली; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT