raj thackeray 
मुंबई

"गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं राज ठाकरेंचं मत"

कार्तिक पुजारी

मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी मनसेप्रमुख राजे ठाकरे यांची भेट घेतली. संभाजीराजे कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते

मुंबई- मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी मनसेप्रमुख राजे ठाकरे यांची भेट घेतली. संभाजीराजे कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात पात मानत नाहीत. पण, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे त्या मताचे आहेत. माझ्या भूमिकेला ते पाठिंबा देतात. माझे पंजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे चांगले मित्र होते आणि छत्रपती- ठाकरे घराण्याचं नातं आजही कायम आहे. किल्ल्याच्या संवर्धनाबाबतही आमच्या चर्चा झाली, असं संभाजीराजे यांनी सांगितलं. ( sambhaji raje meet mns raj thackeray support maratha reservation)

मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांची भेटी घेतोय. हे माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली, आता राज ठाकरेंची भेट झाली. उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेईन. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलंय. यातून मार्ग काढण्यासाठी जबाबदारी माझी एकट्याची नाही, तर सर्व नेत्यांची आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे पण त्यातून आता मार्ग कसा काढायचा आणि समाजाला न्याय कसा मिळायला हवा यावर चर्चा व्हावी, असं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी राज्यभरात फिरत आहे. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आज शरद पवारांची भेट घेतली. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, दु:खी आहे, हे त्यांना सांगितलं. मराठा आरक्षणप्रकरणी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद दूर ठेवून उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनी एकत्र यायला पाहिजे आणि यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शुक्रवारी मी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन. त्यानंतर पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

E20 पेट्रोल चुकूनही वापरू नका! 'या' कार कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Fraud : व्हॉट्सॲपवरील मैत्री पडली महागात; नाशिकमधील विवाहितेला १६ लाखांचा गंडा

Manoj Jarange News: मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल, आंदोलनावर ठाम, अटींचे पालन करण्याचे पोलिसांना हमीपत्र, म्हणाले...

Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT