Sameer Wankhede Sakal
मुंबई

आर्यन खान सुटला, पण समीर वानखेडे अडकले?; तपासावरच प्रश्नचिन्ह

आर्यन खानला खंडणीसाठी अडकवल्याचा आरोप समीर वानखे़डेंवर सातत्याने होत होता.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकताच कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे. त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, असं सांगत एनसीबीनेच आर्यन खानसह ६ जणांना क्लिनचिट दिली आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणारे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. (Sameer Wankhede Ex-NCB officer)

आर्यन खानला (Aryan Khan) क्लिनचिट मिळाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासावरच सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यावेळी समीर वानखेडे करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एनसीबीमधला कार्यकाळ संपलाय. दरम्यान, आता आर्यन खानच्या क्लिनचिटमुळे वानखेडेंनी या प्रकरणात केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सरकारने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच आता निष्काळजीपणाने केलेल्या तपासाबद्दलही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. आर्यन खान प्रकरणात खंडणीसाठी वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्याचंही बोललं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT