Sameer Wankhede Team eSakal
मुंबई

वानखेडे चैत्यभूमीवर; नवाब मलिक म्हणाले, "जय भीम..."

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पढत होते असंही ते म्हणाले.

सुधीर काकडे

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मागच्या महिनाभरापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer Wankhede) यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. हा वाद अनेक दिवस राज्यात चर्चेचा विषय होता. त्यातच समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

चैत्यभूमीवर येण्याचा सर्वांना अधिकार आहे असं ते म्हणाले. समीर वानखेडे वानखेडे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, जय भीम (Jay Bhim) नावाचा सिनेमा आलेला आहे. यामध्ये एस.टी. वर्गातील लोकांवर कसा अन्याय होतो हे दाखवण्यात आलं. असाच संघर्ष मी निर्माण केला असून. या जयभीम इम्पॅक्टमूळेच ते आता अभिवादन करायला येत असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक एकत्र येत असतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माननाऱ्या राज्यासह देशभरातील लोकांचा समावेश असतो. यावेळी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर जास्त गर्दी न करण्याचं आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज चैत्यभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT