Sameer Wankhede esakal
मुंबई

आर्यन खानच्या सुटकेनंतर समीर वानखेडेंचं सूचक ट्वीट; "मी नकारात्मक..."

आर्यन खान प्रकरणात योग्य तपास न केल्याने वानखेडेंवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीकडून क्लिनचिट मिळाली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान वानखेडेंनी एक सूचक ट्विट केलं आहे. (Sameer Wankhede Latest tweet after Aryan Khan clean chit)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण जर तुम्ही असं केलं तर कोणतीही प्रगती होणार नाही. तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला नेहमी गोष्टींच्या सकारात्मक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल आणि आपण नियंत्रित आहोत. जसं, तुम्ही करता त्या निवडींवर तुमचं नियंत्रण असतं".

आर्यन खानकडे (Aryan Khan) कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज असल्याचे पुरावे सापडले नसल्यानं एनसीबीकडून (Narcotics Control Bureau) त्याला क्लिनचिट मिळाली आहे, तसंच आरोपपत्रातून त्याचं नावही वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणाचा तपास योग्य झाला नसल्याचं सांगत सरकारने वानखेडेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. त्या प्रकरणामुळेही अडचणीत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT