Samruddhi Mahamarg sakal
मुंबई

Samruddhi Highway : समृध्दी महामार्गावर लवकरच आयटीएमएस प्रणाली; एन्ट्री, एक्झिट, टोलवसुली आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर राहील करडी नजर

लेन कटिंग, ओव्हरस्पीड, टोलनाक्यांवरील एन्ट्री, एक्झिट आणि टोलच्या वसुलीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि मृत्यूची संख्या बघता लवकरच सध्यस्थितीत सुरू असलेल्या महामार्गावरील क्षेत्रात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) बसवण्यात येणार आहे. ज्यामध्ये एकूण २०३ किलोमीटरच्या महामार्गावर ८० सीसीटिव्ही असणार आहे. ज्यासाठी १,४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

लेन कटिंग, ओव्हरस्पीड, टोलनाक्यांवरील एन्ट्री, एक्झिट आणि टोलच्या वसुलीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. पहिल्या टप्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांतून जाणाऱ्या २०६ किलोमीटर अंतरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचे लोकेशनही नीच्छित केले आहे.

ज्यामध्ये एकूण २०६ किलोमिटर मध्ये ८० सीसीटिव्ही राहणार असून, त्यापैकी औरंगाबाद ११२ किलोमिटर ५० सीसीटिव्ही त्याप्रमाणे जालना ४२.५ किलोमिटर १९ आणि बुलढाणा ५२.५ किलोमिटर ११ सीसीटिव्ही लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: ठाणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ 25–30 मिनिटांत होणार! 13.9 किमी फ्रीवेचा कामाला MMRDA कडून सुरुवात, मार्ग कसा आहे?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

कलाचा निरोप अद्वैतपर्यंत पोहोचणार... 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये शेवटी काय घडणार? 'या' दिवशी प्रदर्शित होणार अंतिम भाग

Pankaja Munde: ''आम्हाला बहीण-भाऊ म्हणू नका'', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या? राजकीय संकेत काय?

Latest Marathi News Live Update : बीडच्या प्रभाग १६ मध्ये मतदान केंद्रासमोरच पैसे वाटप; VIDEO

SCROLL FOR NEXT