Sandeep Deshpande 
मुंबई

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण, आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

काल सकाळी शिवाजी पार्क इथं संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी प्राथमिकरित्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे, पण पोलिसांचा तपास सुरू आहे.

आरोपी कोण आहेत?

मनसे नेता संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अशोक खरात हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तब्बल १३ गुन्हे नोंद आहेत. गवळी गँग मधील एकाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात देखील खरात आरोपी आहे. खरात विरोधात MCOCA अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. भांडुप परिसरात खरात राजकारणात सक्रिय असून दोन वेळा लोक जनशक्ती नावाच्या पार्टीकडून पलिकेलची निवडणूक त्याने लढवली आहे.

परिसरात दहशत निर्माण करून आपला दबदबा वाढवणं हा या हल्यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सांगत असेल तरी त्याला राजकीय पार्श्वभूमी असण्याची देखील दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे हे खरात उपाध्यक्ष आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

White Stork in Ratnagiri : महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला 'युरोपियन पांढरा करकोचा' रत्नागिरीत अवतरला; जाणून घ्या या परदेशी पाहुण्याचा थक्क करणारा प्रवास

कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर अजूनही अव्वल; गुणपत्रिका जाहीर होऊ द्या: महापौर

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

SCROLL FOR NEXT