MNS leader Sandip Deshpande 
मुंबई

Sandip Deshpande Attack: FIR मध्ये ठाकरे, वरुण अशी नावं! हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांचं मोठं पाऊल

मॉर्निंगवॉक दरम्यान संदीप देशपांडे यांना चौघा जणांनी बॅटनं मारहाण केली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे एफआयआरमध्ये ठाकरे आणि वरुण अशा नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष ज्यांनी हल्ला केला त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची ८ पथकं तयार करण्यात आली आहे. (Sandip Deshpande Attack FIR against Aditya Thackeray Varun Sardesai)

ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संदीप देशपांडे यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे. आपल्या जबाबात त्यांनी हल्ल्याचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तसेच हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण अशी दोन नावं घेतल्याचंही देशपांडे यांनी जबाबात सांगितलं. पण हे ठाकरे आणि वरुण नेमके कोण हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, देशपांडेंवरील हल्ल्यानंतर विविध राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचा उल्लेख केला होता.

Sandip Deshpande FIR

देशपांडे यांनी जबाबात काय म्हटलंय?

"मी 'महाराष्ट नवनिर्माण सेना' या पक्षाचा सरचिटणीस व प्रवक्ता आहे. मी दररोज सकाळी शिवाजीपार्क मैदानात मॉर्निंग वॉक करतो. सकाळी 6.45 वा. च्या सुमारास घरातून निघतो. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे दररोज माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला असतात. आज सकाळी 6.50 वा. च्या दरम्यान घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजीपार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट नं. 5 वर पोहोचल्यावर मी घड्याळ पाहिले तेव्हा 7.00 वाजले होते. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे तोपर्यंत आले नव्हते. म्हणून मी एकट्यानेच वॉक सुरू केला. गेट नं. 5 समोर जॉगिंग ट्रॅकवर डावीकडे बळुन मी मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या दिशेने चालत गेलो. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाचे गेट नं. 5 कडे आलो. त्यावेळी अंदाजे 7.15 वाजले असतील, गेट नं. 5 पास करून थोडा पुढे गेलो असताना कुणीतरी मागून माझ्या उजव्या पायाचे मांडीवर कोणत्यातरी टणक वस्तूने जोरात फटका मारला म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले असता तीन/चार तरूण होते. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बँट होते. त्यांनी मला हातातील स्टंप व बँटने मारहाण केली. त्यांचपैकी एकजण माझे डोक्यावर बँट मारत असताना मी हात मध्ये धरला त्यामुळं मी वाचलो परंतू हातावर जोरात प्रहार झाला व मी खाली पडलो. मी पडल्यावरही त्यांनी मला स्टप व बँटने मारहाण केली. मारहाण करताना ते मला शिवीगाळ करत "तुझं खूप झालं, पत्र लिहीतोस का भडव्या? ठाकरेंना नडतोस का? वरूणला नडतोस का?" असे बोलले. ते मला मारहाण करीत असताना मॉर्निंग वॉक करणारे लोक मला सोडविण्यासाठी जवळ येत असताना त्यांनी लोकांना मोठमोठ्याने "साले कोणी मध्ये याल तर, तुम्हालाही मारून टाकु", असे बोलून आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची पळापळ झाली. भीतीने कोणी माझ्या मदतीला आले नाही. ते लोक मारहाण करून राजा बड़े चौकाच्या दिशेने पळत गेले. ते लोक गेल्यानंतर माझे मित्र ललित महाडिक व इतर लोक माझ्याजवळ आले. ललित महाडिक यांनी मला उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मला तपासुन उपचार केले. मारहाणीमध्ये माझा उजवा हात फ्रेंक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले, माझे डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली दुखापत झाली असुन, उजव्या पायावर व इतरत्र मुक्का मार लागला आहे.

मारहाण करणाऱ्या तरुणांचं वर्णनही संदीप देशपांडे यांनी आपल्या जबाबाबात दिलं असून ते पुन्हा समोर आले तर त्यांना ओळखू असंही म्हटलं आहे.

पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तपास पथकं तयार केली आहेत. शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही सध्या तपासले जात आहेत. आरोपींच्या शोधासाठी 8 पथकांच्या माध्यमातून कसून तपास सुरू असल्याची माहिती, पोलिसांच्या हवाल्यानं सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT