साने गुरूजी स्मारकाचा परिसर. 
मुंबई

...म्हणून आहे, साने गुरूजी स्मारक पक्ष्यांसाठी नंदनवन

अजित शेडगे

माणगाव : पशू-पक्ष्यांचे अधिवास असलेली जंगले नष्ट होत असल्याची चर्चा होत असतानाच माणगाव तालुक्‍यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक परिसरात जैवविविधता बहरली आहे. या वास्तूच्या परिसरातील जंगलात तब्बल १०० पेक्षा अधिक प्रकारच्या विविध पशू-पक्ष्यांचे दर्शन होत आहे. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी ठरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गापासून २ किलोमीटरवर माणगावमध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे. या परिसराच्या ३६ एकरपैकी ३० एकरवर जंगल आहे. स्थानिक वृक्षांचे संवर्धन करणे, पारंपरिक वृक्षसंपदा टिकवून ठेवणे, जैवविविधता जपण्याचे अनेक उपक्रम येथे सातत्याने राबविले जातात. ‘नेचर ट्रॅक’द्वारे या ठिकाणी जंगल वाचनाचे कार्यक्रमही होतात. त्यामुळेच परिसरात सुमारे १०० पेक्षा अधिक प्रकारचे पशू-पक्षी आढळून येतात. 

तालुक्‍यातील पक्ष्यांच्या अधिवासाचे हक्काचे घर म्हणून या उद्यानाकडे पाहिले जात आहे. जंगलात जिल्हाभरातून आणि जिल्ह्याबाहेरील अनेक निसर्गप्रेमी या संपदेचे निरीक्षण करण्यासाठी येतात. प्रत्येक हंगामात  पक्ष्यांची संख्या वाढत असल्यामुळे पक्षिनिरीक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

लावा, बुलबुलसाठी अधिवास  
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक परिसरात ढोक, बेसरा ससाणा, लावा, मोर, टिटवी, कवडी, पालू कवडा, हिरोळी, पाऊस पियू, कोतवाल, खंड्या, वेडा राघू, धनेहा, सोनपाठी सुतार, बुलबुल, भेरा कावळा, चिमणी, कांचन, मैना, नवरंग सातभाई, सुगरण, कस्तुरिका आदी ५५ विविध प्रकारच्या पक्ष्यांची प्रत्यक्ष नोंद झाली आहे. पक्षिनिरीक्षकांना जवळपास १०० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आढळून येतात.

काही दिवसांत उद्यानात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ५५ प्रकारच्या विविध पक्ष्यांची अधिकृत नोंद केली आहे. पक्षिनिरीक्षकांनी यापेक्षा अधिक पक्षी या ठिकाणी येत असल्याचे सांगितले आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या या जंगलात भविष्यात अधिक प्रमाणात पक्ष्यांची संख्या वाढेल.
- सतीश शिर्के, व्यवस्थापक, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक 

संरक्षित अधिवास असल्याने या ठिकाणी येणारे पक्षी सुरक्षित आहेत. हिवाळ्यात अनेक पक्षी स्थलांतर करतात. यामुळेही पक्ष्यांची संख्या वाढली असावी. योग्य अधिवासात अनेक पक्षी आढळून येतात.
- प्रवीण कवळे, फूल-पक्षी अभ्यासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT