मुंबई

"काँग्रेसला मिटवण्याचा हा एक मोठा प्लॅन !" संजय निरुपम यांचं धक्कादायक ट्विट

सुमित बागुल

मुंबई : सोनिया गांधी यांनी UPA अध्यक्षपदावर कायम राहण्यास अनिच्छा दर्शवली अशा बातम्या समोर आल्यात  त्यानंतर या जागेसाठी योग्य उमेदवार लवकरच मिळेल असंही त्या म्हणाल्या असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव प्रामुख्याने पुढे येताना पाहायला मिळालं. मात्र स्वतः शरद पवार यांनी या बातमीचं खंडन केलं आणि 'UPA' च्या अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही', मी यूपीएचा अध्यक्ष होणार या बातमीत तथ्य नाही' अशी प्रतिक्रिया स्वतः शरद पवारांनी दिली आहे.

दरम्यान, शरद पवारांना UPA चे अध्यक्ष बनवण्याची सुरु असलेली चर्चा ही राहुल गांधी यांच्याविरोधात पक्षांतर्गत सुरु असलेल्या राजकारणाचा भाग असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. हा काँग्रेसला संपवण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप देखील संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमधून केलाय. 

संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत की, "दिल्ली ते मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान राबवलं जातं आहे, त्याचाच एक भाग म्हणजे शरद पवार यांना UPA चा अध्यक्ष बनवण्याच्या चर्चा. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणजे २३ जणांच्या सह्यांचं पत्र देखील होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नसल्याच्या चर्चा देखील झाल्यात. काँग्रेसला मिटवण्याचा हा एक मोठा प्लॅन आहे", असं संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

sanjay nirupam on sharad pawar as frontrunner as UPA president and conspiracy to finish congress

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT