मुंबई

संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा, मात्र त्याचं झालं असं की...

पूजा विचारे

मुंबई:  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर विरोधकांच्या मागणीनंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवला नाही आहे. 

तीन दिवस उलटल्यानंतरही राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याचं वृत्त आहे.  त्यामुळे राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वनमंत्री पदावर आहेत. 

बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भाजपानं राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. तसंच राजीनामा न दिल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही भाजपनं दिला होता.

दरम्यान पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा राजीनामा या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला.

sanjay rathod resignation still with uddhav thackeray not reached governor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT