Sanjay Raut  Sakal
मुंबई

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, शिवसेनेकडून संभाजीराजेंचा पत्ता कट

सकाळ डिजिटल टीम

येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगलंय.

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मात्र शिवसेनेला अद्याप हा प्रस्ताव मान्य नाही. (Sambhaji Raje Chhatrapati on Rajyasabha)

शिवसेनेने त्यांच्या हक्काच्या जागेवर संजय राऊत यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर सहाव्या जागेचा वादही सेनेने संपवलाय. या जागेवर सेनेकडून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भात मंत्री अनिल परब आणि संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. बैठकीनंतर राऊत यांनी स्पष्ट शब्दा शिवसेनेची बाजू मांडली.

संजय राऊतांसह सेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये राऊत आणि संजय पवार यांच्याच नावाची निश्चिती झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच २६ तारखेला शिवसेनेचे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

यानंतर संजय राऊत तत्काळ 27 तारखेला कोल्हापूरला जाणार आहेत. 28 तारखेला संजय राऊत यांची कोल्हापुरात सभा होणार असून ते संभाजीराजे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. शिवसेना संपर्क अभियानासाठी संजय राऊत कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती आहे.

सेनेची ऑफर आणि पवारांची खेळी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर करताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देत खेळी केली. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि अन्य मविआ सरकारमधील पक्षांची गोची झाली. त्यातच शिवसेनेने राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली. यातून राजकारण आणखी वेगळ्या वळणावर गेलंय. सहावी जागा भाजपच्या गोटातून रिक्त होत आहे. विकास महात्मे यांच्या जागी चाचपणी सुरू आहे. मात्र भाजपला संख्याबळाचं समीकरण साधण्यात घाम गाळावा लागणार असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल, तो उमेदवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात पोलिसांची कारवाई; आरोपी भीमराव कांबळेच्या घरावर नोटीस

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT