Sanjay-Raut-Attacking 
मुंबई

"पंतप्रधान मोंदीनीही लॉकडाउन जाहीर केला होताच ना..."

विराज भागवत

मुंबई: गेले काही दिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागणार की नाही याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास कडक नियम लागू करावे लागतील किंवा अगदीच शेवटचा पर्याय म्हणजे लॉकडाउन करावा लागेल असं राज्यातील बडे नेते सांगताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी, 'लॉकडाउनमुळे आर्थिक समस्या उद्धभवतात. त्याचं काय असं विरोधक विचारत आहेत', अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी काहीसं संतापून राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा दाखला दिला.

मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा!

"लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान होते हे मला माहिती आहे. साऱ्यांनाच याची कल्पना आहे. पण तरीही पंतप्रधान मोदी यांनी पाच-सहा महिने लॉकडाउन केला होता. जनतेची काळजी असते तेव्हा काही निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे लॉकडाउनचे राजकारण करू नये", असं राऊत म्हणाले. "राज्यातील लॉकडाउनच्या मुद्द्याचं राजकारण कोणीही करू नये. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जे काही सांगत आहेत ते राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी सांगत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा", असं राऊत म्हणाले.

शरद पवार यांची भेट घेण्याबद्दल...

"शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यांना सध्या आरामाची गरज आहे. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो नाही. पण मी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कात असून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट सुप्रियाताईंकडून घेत आहे. दोन-चार दिवसात ते पूर्णपणे ठणठणीत होतील. त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू", असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT