मुंबई

उद्धव ठाकरेंवर जमीन व्यवहाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

पूजा विचारे

मुंबईः अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबीयांमध्ये जमीन व्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर व्यवहारावरून आरोप करण्याचे कोणतेही कारण नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्ही जे आरोप करताय ते सर्व बिनबुडाचे आहेत. त्यामुळे जे आरोप करताय ते सिद्ध करा, अन्यथा आरोप करू नका असही राऊत म्हणालेत. तर  आता तुम्हाला घरी बसवले आहेच, त्यामुळे आता पुढील 25 वर्ष घरीच बसावे लागणार असल्याचा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

पुढे संजय राऊत म्हणाले की, खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा, हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगणार नाहीत. मुळात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण आहे. त्यावर मी बोलत नाही. पण एक आमची मराठी भगिनी, तिचं कुंकू पुसलं गेलं. त्या स्वतः आणि त्यांची कन्या. या गेल्या अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करताहेत. त्यावर हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी, प्रवक्ते बोलायला तयार नाहीत. आणि आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळी तपासाची दिशा भरकटून टाकण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते हे असे मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. २१ व्यवहार केल्याचा आरोप करताहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार,असंही राऊत यांनी ठणकावलं.

Sanjay Raut attack on Kirit Somaiya who accused Uddhav Thackeray of land dealing

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

Pratik Shinde Car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रिल स्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर क्रेटाला धडकली, तीन गाड्यांचे लाखोंचे नुकसान

Maharashtra Rain : मान्सून जाता जाता झोडपणार, महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता; येत्या २-३ दिवसात कसं असेल वातावरण?

Bachchu Kadu: बोगस कृषी औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या : बच्चू कडू, देवळीत दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

SCROLL FOR NEXT