मुंबई

"महाराष्ट्र अपयशी ठरला असेल तर ते केंद्राचंच अपयश"

विराज भागवत

मुंबई: राज्यात गेले काही दिवसांपासून लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू आहे. केंद्रातील सरकार सध्या राज्यावर टीका करत आहे. तर ठाकरे सरकारमधील नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं प्रखर मत मांडलं. "केंद्रातील सरकारने राज्यावर केलेले आरोप म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्ये अपयशी असल्याचे केंद्राचे म्हणणं असेल तर हे केंद्राचंच अपयश आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वाखाली धोरणाची ही लढाई लढली गेली आहे. मोदी यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन आपलं राज्य सरकार करत आहे. त्यामुळे हे केंद्राचंच अपयश आहे", असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

"जिथे भाजपचं सरकार नाही, तेच कसे काय अपयशी ठरले. जिथे भाजपचं सरकार आहे, तिथे कोरोना पळून गेला. भाजपचे सरकार आहे, तिथे काही नवीन धोरण केंद्राने तयार केले आहे का? तसं नसेल तर असे आरोप प्रत्यारोप केंद्राने करू नये. महाराष्ट्राने प्राण जाये पर वचन न जाये' अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने कोरोनाविरूद्धची मोहीम राबवली. संपूर्ण देशाचा भार महाराष्ट्रावर आहे. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत. गुजरातमधील भाजपच्या कार्यालयामध्ये हवी तेवढी रेमडेसिवीर मिळत आहेत. अशा कृत्यांमुळे हे राष्ट्र एक असलं तरी ते एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसत नाही", असा टोला त्यांनी लगावला.

"राज्यात लॉकडाउन असेल तर विरोधी पक्ष आंदोलन करेल असं विरोधक म्हणताहेत. तसेच केंद्राकडून राज्याची सातत्याने बदनानी केली जात आहे. अशा वक्तव्यांचा निषेध हा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी सर्वात आधी केला पाहिजे. कारण हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण जर त्यांना हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे वाटत नसेल, तर महाराष्ट्रात राजकारण करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. आंदोलन हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांना करू द्या. एकीकडे महाराष्ट्रामध्ये अपयश असल्याचं केंद्र म्हणतं तर दुसरीकडे अशा पद्धतीने भाजपचे नेते वागत आहेत. असं होतं असेल तर काय म्हणायचं?", अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT