मुंबई

तसं घडलं तर आम्ही नक्कीच पेढे वाटू- संजय राऊत

विराज भागवत

मुंबई: राज्याच्या निवडणुका झाल्या आणि २०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आले. त्यानंतर विधान परिषदेसाठी या आघाडीने १२ उमेदवारांची (12 MLAs) नावे राज्यपालांना दिली. पण त्या १२ नावांचा प्रस्ताव असलेली फाईल सापडत नाही असं स्पष्टीकरण राजपाल्यांच्या (Governor) कार्यालयाकडून देण्यात आलं. हे प्रकरण काहीसं तापल्यानंतर ती फाईल राजभवनातच (Raj Bhavan) आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या गोंधळावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली. "हरवलेली फाईल मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल जेव्हा सही करतील, तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. (Sanjay Raut Reaction after Confusion in Raj Bhavan over 12 MLAs File Sweets Distribution)

"राजभवनातील फाईल भूताने पळवली असं मला वाटत होतं. पण आता फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवलेली नव्हती. पण असं असलं तरी राजभवनाच्या आसपास काही भूतं असावीत", असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. "फाईलच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. फाईलवर वेळेत न होण्यासाठी ती फाईल बोफोर्स, राफेल किंवा कोणत्या भ्रष्टाचाराची आहे का?", असा सवालही त्यांनी केला.

"महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाने १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. हा एकमताने घेतलेला निर्णय आहे. तरीही त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल, तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणारे आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामातील गतीमानता वाढवली तर महाराष्ट्राची गतिमान परंपरा टिकून राहील", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

भाजप-RSS बैठकीबाबत...

"उत्तर प्रदेशातील घटनांवरून भाजप-संघ बैठक झाली. सरसंघचालक मोहनराव भागवत आदरणीय आहेत. परखडपणे त्यांनी काही गोष्टींवर मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला आणि मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहून आली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वचा होता आणि राममंदिराइतकाच महत्वाचा होता . त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जनतेला अपेक्षा आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं याबद्दलचं मत व्यक्त केलं पाहिजे", असे राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT