Sanjay-Raut-Attitude 
मुंबई

'नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहील'

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर कमिटी बनवावी

दीनानाथ परब

मुंबई: "देशात कोरोनाची स्थिती गंभीर असून सर्वोच्च न्यायालय सक्रीय झालय ही चांगली बाब आहे. कोरोनाविषयक प्रश्नावर आज त्यांच्याकडे अनेक याचिका असून काही विषयांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे" असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. "लसीकरणाबद्दल अजून स्पष्टता नाहीय. महाराष्ट्र अजूनही लसींच्या प्रतिक्षेत आहे. महाराष्ट्राला हव्या तितक्या प्रमाणात लसी मिळत नाहीयत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पांच सुद्धा हेच म्हणण आहे" असे संजय राऊत म्हणाले.

"अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढतोय, झगडतोय. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं. पण फटकारुन काय होणार?. कोरोना राष्ट्रीय आपत्ती मानली आणि केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल. त्यांचं सुद्धा नियंत्रण सुटलं असेल, तर हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर कमिटी बनवावी."

"केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय याकडे पाहिलं. सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली म्हणजे कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही. ऑक्सिजनपासून लसीकरणापर्यंत, रेमडेसिव्हीर पासून ते बेडस, औषधांपर्यंत केंद्राकडून योग्य प्रकारे नियंत्रण होणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन राजकारण विरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहील" असे राऊत म्हणाले.

"महाराष्ट्राची जनता गेल्या दोन वर्षांपासून संकटात आहे. मागचा १ मे साजरा करु शकलो नाही यंदाचा १ मे सुद्धा साजरा करु शकलो नाही . महाराष्ट्राला संकटात लढण्याची परंपरा आहे. आपण या संकटातून बाहेर पडू" असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT