Shivsena sanjay raut on eknath shinde new shivsena national executive committee political news  Sakal
मुंबई

Sanjay Raut on Eknath Shinde : "आमच्याकडं पक्की खबर, शिंदे गटात लवकरच होणार स्फोट"; संजय राऊतांचं भाकीत

संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटाबाबत खासदार उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंगे गटात लवकरच स्फोट होणार असून कोणाचं काय चाललंय याची आमच्याकडं पक्की खबर आहे, असंही त्यांनी नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना म्हटलं. (Sanjay Raut slams on CM Eknath Shinde says as soon as blast happened in this group)

राऊत म्हणाले, "शिंदे गटामध्ये सध्या काय सुरुय, कुणाचं काय बिनसलंय याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्यामुळं शिंदे गटात लवकरच स्फोट होईल. गद्दारांच्या कपाळावर आता गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळं त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. यांच्या पिढ्यांना ही 'गद्दारी' शांत जगू देणार नाही"

कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले अशा शब्दांतच संबोधलं जातंय. त्यामुळं फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य राहिलेलं नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी केल्यावरुन राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकार टोला लगावला आहे. यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण यामुळं आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT