Sanjay Raut News e sakal
मुंबई

आम्ही देखील पाहून घेऊ, अनिल परबांच्या कारवाईनंतर राऊतांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आलाय. परब यांचे अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी दंड थोपटले आहेत. यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली.

(Sanjay Raut On Anil Parab ED Raid)

आज खासदार संजय राऊत आणि सेनेचे नेते संजय पवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल कऱणार आहेत. त्याआधीच ही करावाई झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी कारवाई झाल्यानंतर थेट केंद्र आणि भाजपवर आरोप करत प्रतिआव्हान दिलं आहे. आम्हीही बघून घेऊ, असं ते म्हणाले.

अनिल परब कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्या विरोधात राजकीय सुडबुद्धीने या कारवाया सुरू आहे. ज्या पद्धतीचे आरोप आमच्यावर लावले जात आहेत. त्यापेक्षा गंभीर गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. ईडीने त्याचीही चौकशी करावी, असं राऊत यांनी म्हटलंय.

आम्ही सर्व शिवसैनिक आणि पक्ष परबांच्या पाठिशी उभे आहोत. मनपा निवडणुका सुरळीत पार पडतील. महाविकास आघाडी सरकारही सुरळीत चालेल, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रीतील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधीच लागलं नाही. या कारवायांमुळे महाविकास आघाडीचं मनोबल ढासळणार नाही. आमच्याकडे सुद्धा सबळ पुरावे आहेत. जितू नवलानीला कोणी पळवलं, याचं उत्तर सबळ पुरावे असणाऱ्यांनी द्याव, असा टोला ही राऊतांनी लगावलाय.

फक्त सरकारला त्रास देण्यासाठी या कारवाया सुरू आहेत. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि मविआ सरकारला अडचणीत आणण्यासाठी या कारवाया आहेत. पण आमच्या मनोबलावर काही कारवाई होणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT