shah-pawar.jpg 
मुंबई

'आता तरी रहस्य कथेचा शेवट करा', शाह-पवार भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांचे सूचक टि्वट

दीनानाथ परब

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पियो कार स्फोटक प्रकरणात API सचिन वाझेला अटक झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दररोज राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यात ते यशस्वी सुद्धा ठरताना दिसत आहेत. काल एका वर्तमानपत्राने अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवारांची भेट झाल्याचे वृत्त दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही सोबत असल्याचा दावा करण्यात आला. 

अमित शाह यांना, जेव्हा या भेटीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी 'अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात' असे, उत्तर देऊन एक प्रकारे या चर्चेला हवाच दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अशी कुठलीही भेट झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

या कथित भेटीच्या बातमीवरुन मात्र राज्याच्या राजकारणात विविध तर्क-विर्तकांना ऊत आला आहे. विविध अंदाज वर्तवले जात आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, शरद पवार आणि अमित शाहंमध्ये अशी कुठलीही गुप्त भेट झाली नसल्याचा ठामपणे दावा केला आहे. 
 

त्याआधी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत काय म्हणाले?
"त्या भेटीत सस्पेंस ठेवण्यासारखं काय आहे? देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर भेट आणि चर्चा झाली असेल तर त्यात चुकीचं काय? एखादा मोठा नेता किंवा खासदार गृहमंत्र्यांना भेटला तर त्यात काहीही वावगं नाही. अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो. कोणीही भेटू शकतं. ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे अशा भेटींमध्ये काहीही चूक नाही", असं संजय राऊत म्हणाले.

"अमित शाह यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की काही चर्चा या सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाहीत. पण मला असं वाटतं की भेट कितीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केली तरी कधी ना कधी बंद दाराआडच्या चर्चा सार्वजनिक होतातच. मात्र, एक लक्षात ठेवा की राजकीय बैठका या कधीही गुप्त नसतात. त्यातील चर्चा कधी ना कधी बाहेर येतातच", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : चौथीच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन; शाळेवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Nashik Cyber Fraud : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असूनही फसले! निवृत्त अधिकाऱ्याने २.२४ कोटींची आयुष्यभराची कमाई गमावली

Shah Rukh Khan : शाहरुखला आजही होतो बाळासाहेबांना न भेटल्याचा पश्चाताप, या कारणाने झाला होता वाद, काय घडलेलं नेमकं?

Mumbai Morcha: विरोधकांच्या मोर्चाला भाजपचे प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंवर प्रदेशाध्यक्षांचा घणाघात!

Chandrakant Gurav : नाशिकच्या शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ हरपला; चंद्रकांत गुरव यांचे दुखद निधन

SCROLL FOR NEXT