मुंबई

संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."

संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..." सध्या राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच गाजतोय Sanjay Raut Warning Pm Modi BJP Govt that Using Central Agencies to Annoy Mahavikas Aghadi govt can be dangerous

विराज भागवत

सध्या राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच गाजतोय

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खूप चांगली भेट झाली. सध्या विरोधकांकडून काही शाब्दिक हल्ले केले जात आहेत. मुद्दाम काही भ्रम निर्माण केले जात आहेत. काही आरोपही केले जात आहेत. त्या गोष्टीला त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर  महाराष्ट्र  सरकारविरोधात केला जातोय. राजकारणात  नवे  पायंडे पाडले जात आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जी  हत्यारं वापरत आहात ती तुमच्या  विरोधातही उलटू शकतात. भाजप सरकारने याचा विचार करावा, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या केंद्रातील भाजप सरकारला दिला. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी त्यांनी 'साम टिव्ही'शी खास बातचीत केली. तेव्हा त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली. (Sanjay Raut Warning Pm Modi BJP Govt that Using Central Agencies to Annoy Mahavikas Aghadi govt can be dangerous)

"काँग्रेसने सरकारी यंत्रणांचा वापर केला असा आरोप करून त्यांना दोषी ठरवणारं भाजप सरकार स्वत: त्याच मार्गाचा अवलंब करत आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल, अशा भ्रमात राहू नये. आमच्या मंत्र्यांना, आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणे याला राज्य चालवणं म्हणत नाहीत. तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांची पथकच्या पथक बोलावलीत तरी आम्ही लढतच राहू", असे राऊत म्हणाले. तसेच, राज्यातील विरोधी पक्ष (भाजप) स्वतःचा अभिमन्यू करू इच्छित आहे का, हे देखील त्यांनीच ठरवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

"राज्यपालांनी अनेक स्मरणपत्र मुखमंत्र्यांना पाठवली आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी एकच स्मरणपत्र त्यांना पाठवलं आहे. ते म्हणजे १२ विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीचे... राज्यपालांना याच प्रश्नाचं विस्मरण का होतं असावं, हा प्रश्न आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन राज्यपाल काम करत असतील तर घटनात्मक भूमिकेत जाऊन आम्हाला काही आठवणी करून द्याव्या लागतील", असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT