मुंबई

'आ देखे जरा किसमे कितना है दम'! ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

तुषार सोनवणे

मुंबई -  शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावली आहे. याप्रकरणी त्यांना मंगळवारी (ता. 29) ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती ईडी अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली नसती तर नवलच! राऊत यांनी एक ट्विट करून विरोधकांना इशारा दिला आहे.

पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी काही संशयित बॅंक व्यवहार आहेत. त्यांची पडताळणी करण्यासाठी राऊत यांची चौकशी करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ''आ देखे जरा किसमे कितना है दम , जमके रखना कदम मेरे साथिया''!  त्यामुळे आता राऊत यांनी दिलेला इशाऱ्याचे काय राजकीय पडसाद उमटतात.हे पाहणं महत्वाचं आहे.

शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा 
दरम्यान, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून, त्यासाठी बुधवारी (ता. 30) मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली. खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर दुसरीकडे या नोटिसीमुळे शिवसेना नेत्यांमध्ये चर्चांना ऊत आला आहे.

Sanjay Raut warns opposition after ED summons on tweet

------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT