मुंबई

संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल होणार, उद्या पुन्हा अँजिओप्लास्टी

पूजा विचारे

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्या उद्या दुपारनंतर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरांनी परत अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. 

लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करणार आहेत.  डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया होईल. आज सायंकाळी संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल होणार असून सुरूवातीला अँजिओग्राफी केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 

संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे. राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाईल.

Sanjay Raut will be admitted Lilavati for angioplasty again tomorrow

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT