मुंबई

ऐन परीक्षा हंगामात पटेल जयंतीचा हट्टहास 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : शाळांच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा विचार न करता शिक्षण विभागाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी करण्याचा घाट घातला आहे. शपथ समारंभ, एकता दौड यासह अनेक स्पर्धा घेण्यासाठीचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. यामुळे परीक्षांचे वेळापत्रक बिघडण्याची भीती शिक्षकांनी व्यक्‍त केली आहे. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने 31 ऑक्‍टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून देशभरात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे तात्काळ पालन करत शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यभरातील शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत.

परीक्षा संपल्यानंतर 5 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. परीक्षा आणि सुट्टीचे वेळापत्रक ठरले असताना शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशामुळे परीक्षांचे वेळापत्रक बिघडण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा आहेत, त्या शाळांनी परीक्षा कालावधी सोडून शपथ समारंभाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत; तर ज्या शाळांमध्ये परीक्षा नाहीत, त्यांनी अनेक स्पर्धा आयोजित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. 

दौडसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा! 
ज्या शाळांमध्ये परीक्षा नाहीत, त्यांनी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा, संगीत, नाटक व एकांकिका स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने शपथ समारंभ आयोजित करावा. तसेच एकतेसाठी दौड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. या दिनामुळे शाळांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची भीती काही शिक्षक व्यक्त करत आहेत; तर सुट्टीनंतर हा दिवस साजरा करता येऊ शकतो, असेही मत काही शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT