मुंबई

एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

तेजस वाघमारे

मुंबई:  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पीसीबी गटात 19 विद्यार्थ्यांना 100  पर्सेंटाइल गुण तर पीसीएम गटात 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. 

100 पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात पुण्याची सानिका गुमास्ते, शुभम जोग तर मुंबईतून केतकी देशमुख, चैतन्य व्होरा, सोहम चिटणीस, निष्ठा पांडे, आर्यमन शार्दुल, रिशभ बाली, पार्थ गुजराती आण ठाण्यातून पवन कुंटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

पीसीबी गटात पुण्याचा अनिष जगदाळे, पालघरची वर्षा खुशवाह, मुंबईतील तनय मांजरेकर, देवेश शाह, जयेश चौधरी, परिता गाडा या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात 187 केंद्रांवर आणि राज्याबाहेरील 10 अशा एकूण 197 केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. 

तीन लाख 86  हजार 604 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख 74 हजार 679 विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख 1 हजार 925 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या निकालामुळे आता इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Saturday MHT-CET 2020 exam results announced

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT