मुंबई

वाडीया रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर स्टाफचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

परळच्या वाडिया या रुग्णालयातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा धक्कादायक दावा रुग्णालयात काम करणाऱ्या एका स्टाफने केला आहे. वैशाली पाटील या गेल्या 22 वर्षांपासून नवरौजी वाडिया रुग्णालयात स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा रुग्णालयातील भोंगळ कारभारावर आवाज उठवला आहे. आता त्यांनी व्हिडीओ तयार करत रुग्णालयात कोरोना रुग्ण आल्याचा दावा केला आहे. 

वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. शिवाय, रुग्णालयात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले पीपीई किट्स, मास्कही नित्कृष्ट दर्जाचे दिले जातात, असंही त्यांनी त्यांच्या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे, वाडिया रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

13 एप्रिल या दिवशी एक गर्भवती महिला रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर या महिलेने आपण कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. पण, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या महिलेला कोरोनाची माहिती देऊ नये असं सांगितलं. त्यानंतर तिला कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत ही महिला काही नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती.

वाडिया रुग्णालयातील 3 लॅब टेक्निशियन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, आयसोलेट वॉर्डमध्ये 8 ते 9 जण दाखल असून त्यात 2 स्टाफ, १ सिस्टर इंन्चार्ज, १ क्लर्क, १ वॉर्डबॉय आणि १ आयाबाई यांना ठेवण्यात आलं आहे. शिवाय, 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे दिवस न पाळत रक्तपेढी, अनेक विभाग सुरू केले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून या सर्व बाबतीत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही या वाडिया रुग्णालयाच्या वैशाली पाटील यांनी केला आहे. 


मोठी बातमी - कसं समजेल सरकार तुमचे  WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

"रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. व्हिडीओत मी जे काही बोलले आहे ते सर्व खरं आहे. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे हे माहित असूनही रुग्णालयाने तिला दाखल करुन घेतलं. नंतर कस्तुरबामध्ये पाठवलं. तोपर्यंत ही महिला बऱ्याच लोकांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संशयित रुग्णालयात असू शकतील. आम्हाला काम करतानाही भीती वाटते. कारण, दिलेले पीपीई किट्स अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यातून आमचा बचाव होणार नाही. त्यामुळे, किमान 2 महिने रुग्णालय सील झालेच पाहिजे..
- वैशाली पाटील, सिनियर स्टाफ, वाडिया रुग्णालय, परळ

रक्तपेढी -

नवरोसजी वाडिया मँटर्निटी रूग्णालयातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "या रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये काम करणार्या एका तंत्रज्ञ महिलेला घरी असताना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने त्यानी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू केले. चौथ्या दिवशी या महिलेची कोरोना चाचणी करण्याचां सल्ला डॉक्टरांनी दिला आणि त्यानुसार चाचणी केली. दोन दिवसांनी हा चाचणी अहवाल मिळाला. यात ही महिला पाँझिटीव्ह असल्याचे निदान झाले. मात्र, सुट्टीवर जाण्यापूर्वी ही महिला कामाच्या ठिकाणी सहा जणांच्या संपकाँत आली होती म्हणून खबरदारी म्हणून सर्वांची चाचणी करण्यात आली असता सहा पैकी दोन जणांच्या कोरोना चाचण्या पाँझिटीव्ह आल्या आहेत आणि या सर्वांना त्वरित घरीच क्वारंटाईन करण्यात आले . विशेषतः रक्तपेढीतील चाचण्या करण्यासाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात आहेत. याशिवाय, प्रोटोकॉलनुसार ब्लड बँक क्षेत्राचे योग्य निर्जंतुकीकरण केले गेले आहे. दरम्यान, या कालावधीत गेल्या महिनाभरात कोणतेही रकतदान शिबीर भरवण्यात आलेले नाही."

आपत्कालीन विभाग -

आधी नोंदणी नसलेल्या एका ९ महिन्याची गरोदर महिला आपत्कालीन विभागात १३ एप्रिल रोजी सकाळी दाखील झाली. या महिलेची एच.एन. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी झाली होती. परंतु चाचणी अहवाल प्राप्त झाला नव्हता पंरतू त्यावेळी तिकडे चौकशीअंती अहवाल पाँझिटिव्ह आल्याचे समजले. वाडिया रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात अर्धा तास राहिल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार या महिलेला अन्य रूग्णालयात हलवले. सरकारी तसेच पालिकेच्या नियमानुसार सर्व आरोग्य कर्मचारांना पीपीई प्रोटेक्शन किट देण्यात आले होते. या दरम्यान, अतिरिक्त खबरदारी म्हणून या महिलेच्या संपर्कात आलेल्यांना रूग्णालयात आयसोलेटेड करण्यात आले असून सात दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. सध्या कोणत्याही व्यक्तीमध्ये श्वसनाशी संबंधित कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT