trumpet player 
मुंबई

"CM साहेब, किती वेळा भीक मागायची"; तुतारी वादकाचा ऑन कॅमेरा आत्महत्येचा प्रयत्न

अनेकदा मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधूनही त्यांनी आपली व्यथा मांडली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कलेचा आदर होत नसल्यानं निराश झालेल्या एका लोककलाकारानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेतल्यानंतरही आपला घराचा प्रश्न सुटत नसल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. साम टीव्हीला मुलाखत देत असताना ही घटना घडलीये. साम टीव्हीचे प्रतिनिधी आणि अन्य सहकाऱ्यांनी वेळीच त्याला रोखल्याने अनर्थ टळला. (Tutari player attempted suicide)

हरिदास गुरव असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तुतारी वादकाचं नाव आहे. सन 1995पासून ते आपली कला सादर करत आहेत. मात्र आपल्या कलेची किंमत होत नाही, असं सांगत त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी असलेल्या प्रतिनिधी आणि पोलिसांनी त्यांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला.

का उचललं टोकाचं पाऊल?

तुतारी वादक हरिदास गुरव हे मुंबईतील घाटकोपर इथं राहतात. आपल्याला कालाकारांच्या कोट्यातून घर मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री तसेच नेत्यांशी संपर्क साधला होता. मात्र, अद्यापही त्यांना स्वतःचं घर मिळू शकलं नाही. आपल्या कलेचा होत नाही अशी खंत व्यक्त करत त्यांनी आज (शुक्रवार) शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायथ्याशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दहीहंडीच्या कालावधीत गुरव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की, त्यांना घर मिळेल. कालपासून ते मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचे सचिव कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळं आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT