Education
Education 
मुंबई

शाळा, कॉलेजचे नवे प्रोफाइल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कारभार ‘हायटेक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंडळाने माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना नवे प्रोफाइल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची अद्ययावत माहिती उपलब्ध करताना दर वर्षी अडचणी येतात. शाळा महाविद्यालयांकडून अनेकदा जुनीच माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. शाळांनी सध्याची माहिती ऑनलाइन भरायच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात हे कामकाज केले जाणार आहे.

त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली असून, याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी भौगोलिक माहिती गुगल मॅपवरून द्यावी, अशी सूचनाही मंडळाने केली आहे. युडायस आयडी, ओटीपी, पासवर्ड यांसारख्या आधुनिक प्रणाली वापरण्यात येणार  आहे. या माहितीत होणाऱ्या बदलाची नोंद घेण्यासाठी ०२०-२५७०५२०५ असा  क्रमांक व srateboardonline@gmail.com हा ईमेल  देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT