sachin-waze 2.jpg 
मुंबई

मुकेश अंबानींना मिळालेल्या धमकीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन

सकाळ डिजिटल टीम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला एका स्कॉर्पियो कारमध्ये स्फोटक सापडली. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या, त्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता सुद्धा या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. स्कॉर्पियो कारमध्ये स्फोटक सापडली, त्यानंतर धमकीचा एक संदेश पाठवण्यात आला होता. जैश उल हिंद या दहशतवादी संघटेनेने या स्फोटक प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, वसईतील एका हस्तकाच्या मार्फत तिहार जेल मधील अंडरवर्ल्डशी संबधित एका व्यक्तीशी संपर्क साधून हा संदेश पाठवण्यात आला होता. याबाबत NIA  अधिक तपास करत आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा विश्वासू असलेला हा गँगस्टर सध्या तेथील एका रुग्णालयात दाखल आहे. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील एका स्थानिक व्यक्तीला धमकीसाठी फोन केल्या प्रकरणी या गँगस्टर विरोधात तक्रार करण्यात आली होती. या गँगस्टरच्या वसईतील हस्तकाच्या मदतीने हा संदेश पाठवण्यात आला होता. तसेच मनसुख हिरेन हत्येचा तपास भरकटवण्यासाठी त्याचे शेवटचं लोकेशन वसई दाखवण्यात आलं होते. त्यातही या हस्तकाने आरोपीला मदत केली होती का ? याबाबतही NIA तपास करत आहे.

धमकीचा संदेश म्हणून घेतला मागे
जैश उल हिंद नावाच्या संघटनेनं अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे NIA ही केस तात्काळ आपल्याकडे घेईल अशी भिती वाटू लागल्यामुळे काही तासातचं ही जवाबदारी फेटाळणारा संदेशही वायरल करण्यात आला होता. पण त्यानंतरही NIAनं ही केस ताब्यात घेतल्याने आरोपींचा डाव फसला.

ब्लॅक ऑडी कारचे कनेक्शन
एनआयए गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ऑडी कारचा शोध घेत होती. तिची ओळख आता पटलेली आहे.  NIAच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIAन करत होता.  या कारमध्येचं विनायक शिंदे आणि सचिन वाझे हे दिसत आहेत.  एका टोल नाक्यावरील हा CCTV फूटेज असून ही कार वसई परिसरात असल्याची माहिती NIA ला मिळाली आहे. त्यानुसार NIAकडून आज वसई परिसरातून ही कार जप्त करण्यात आली आहे. दरम्यान  एनआयएनं मंगळवारीच एक आऊटलॅंडर गाडीही नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून जप्त केली आहे. 

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT