अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर? 
मुंबई

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

संतोष भिंगार्डे

मुंबई ः केंद्र सरकारने चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून उघडण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळ अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट  दिवाळीत प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा रंगली होती. पण चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल असे समोर आले आहे.

पन्नास  टक्के  प्रेक्षक संख्या ठेऊन चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. पण 15 ऑक्टोबरनंतर चित्रपटगृह संपूर्णरीत्या सुरू होतील की नाही याची माहिती अजून समोर आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने अजूनही थिएटर उघडण्यासंदर्भात काही माहिती दिली नाही. केवळ लवकरच सुरू होतील असे सांगण्यात आले आहे. मात्र माहिती व प्रसारण मंत्रालय लवकरच थिएटर संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करील, अशी शक्यता वाटते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी 'सूर्यवंशी' हा चित्रपट रिलीज होणार नाही हे निश्चित झाले आहे. 

अक्षयचा 'सूर्यवंशी' आणि रणवीर सिंगचा '83' रिलीज कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिसेंबर ते मार्च या कालावधीत हे चित्रपट प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा चित्रपट 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी आपल्याला पहायला मिळणार आहे.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT