मुंबई

पोपटाला स्क्रिप्ट बारामतीवरून मिळते- फडणवीस

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- आजकाल पोपटाला स्क्रिप्ट बारामतीहून मिळते आणि पोपट बडबड करतो अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सूरु झाले असून मुंबईतील भाजपच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राज यांची खिल्ली उडवली. बारामतीला पोपटाची कमी पडली, की ते नवीन शोधून काढतात. त्यांना जे बोलता येत नाही, ते या पोपटाच्या तोंडून बोलवून घेतात. ज्यांना एक नगरसेवक निवडूण आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेईंग कॅप्टन असतो. हे नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही अन् बारावा गडीही नाही. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतलीय, त्या सुपारीनुरुप ते भाषणं करत राहतील. पण, त्यांच्या भाषणाने कुणीही विचलीत होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

मोदीजींवर थुंकणाऱ्याच्याच अंगावर थुंकी पडेल हे लक्षात ठेवा. मोदींच्या नेतृत्वात 4 वर्षात मुंबई सुधारतेय, मुंबईतील गरीब, झोपडपट्टीतील माणसाचाही विकास होत आहे. आज प्रत्येक गरीबाला घराची चावी देण्याचं काम होतंय. संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय, भारत बदलतोय हे आपण लक्षात ठेवायला हवं. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात 45 जागा जिंकून दाखवेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT