Contaminated sea water sakal
मुंबई

Sea Water Pollution : दूषित पाण्यामुळे समुद्र काळवंडला

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सोडलेल्या पाण्यामुळे समुद्राचे पाणी काळवंडल्याचे आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सोडलेल्या पाण्यामुळे समुद्राचे पाणी काळवंडल्याचे आढळून आले आहे.

मनोर/ बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सोडलेल्या पाण्यामुळे समुद्राचे पाणी काळवंडल्याचे आढळून आले आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून काढलेल्या चित्रफितीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आली होती, पण कलर रिमुव्हलची प्रक्रिया न करता ते सोडले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीला सर्वांत प्रदूषित वसाहतीचा शिक्का बसला आहे. राष्ट्रिय हरित लवादाकडून औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून दररोज सुमारे ५० एमएलडीपेक्षा अधिक घातक रासायनिक सांडपाणी सोडले जाते. सद्यस्थितीत जुने २५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्यात आले आहे. नवीन ५० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र निम्म्या क्षमतेने कार्यरत आहे.

मासेमारी संकटात

केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी छुप्या पद्धतीने समुद्रात सोडल्याने समुद्रासह परिसर विद्रुप झाल्याचे चित्र आहे. समुद्र दूषित झाल्याने माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी जीव धोक्यात घालून खोलवर जावे लागत आहे. प्रदूषणामुळे समुद्र खाडीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे, दुर्गंधीही पसरत आहे.

सांडपाणी प्रक्रियेसाठी पाठवण्यात येते. तसेच टँकरचे पृथक्करण केल्यानंतरच पाणी घेतले जाते.

- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Miraj Dangal : मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य; नेमकं रात्री काय घडलं?, पोलिसांची भूमिका काय

Laxmi Niwas : अखेर तो क्षण आलाच ! जान्हवी शिकवणार जयंतला धडा; लेखिकेचंही कौतुक करत प्रेक्षक म्हणाले "ज्जे बात !"

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा पारा चढला, पुढील काही दिवसांत उकाडा वाढणार

SCROLL FOR NEXT