seawoods sector 44 construction worker ended his life accused arrested navi mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai : सीवूड सेक्टर-44 मधील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्या प्रकरणात त्याच्याच कार्यालयातील कर्मचारी अटकेत

सीवूड सेक्टर-44 भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सीवूड सेक्टर-44 मधील मनोजकुमार सिंग (39) या बांधकाम व्यवसायीकाची हत्या त्याच्याच कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयाने केल्याचे उघडकीस आले आहे. राजु उर्फ शमशुद्दीन आझम खान अबु कुरेरा (22) असे या कर्मचाऱयाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास राजुने मनोजकुमार सिंग याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र त्याने हि हत्या कशामुळे केली? हे अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांकडुन त्याची कसुन चौकशी करण्यात येत आहे.

या घटनेतील मृत मनोजकुमार सिंग हा उलवे भागात राहण्यास होता. तसेच सीवूड सेक्टर-44 भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय होते. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या त्याच्या कार्यालयात काम करणाऱया दोन मुली कामावर आल्यानंतर मनोजकुमार सिंग हा रक्ताच्या थारोळयात पडल्याचे निदर्शनास आले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. मनोजकुमार सिंग याच्या शवविच्छेदनात त्याच्या डोक्यात जड वस्तु मारुन त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱया विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.

मृत मनोजकुमार सिंग याने आपल्या कार्यालयाच्या दरवाजातच मेटेल डिटेक्टर लावले होते. तसेच त्याच्या कार्यालयाचा दरवाजा आतल्याबाजुने उघडले जात होते. त्यामुळे बाहेरचा कुणी व्यक्ती आतमध्ये घुसून त्याची हत्या करणे अशक्य होते.

त्यामुळे मनोजकुमार सिंग याची हत्या त्याच्याच ओळखीतल्या व जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय बळावल्याने एनआरआय पोलिसांनी मनोजकुमार सिंग याच्या जवळचे मित्र व कार्यालयात काम करणाऱया सर्वांचीच चौकशी सुरु केली.

मनोजकुमार सिंग याच्या कार्यालयात काम करणारा कर्मचारी राजु उर्फ शमशुद्दीन आझम खान हा कायम मनोजकुमार याच्यासोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात तफावत असल्याचे आढळुन आले.

त्यामुळे पोलिसांनी त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्यानेच मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार सिंग याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. सदरची हत्या त्याने का केली, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने त्याची अधिक चौकशी सुरु असल्याचेही पोलीस सुत्राने सांगितले.

या घटनेतील मृत बांधकाम व्यवसायीक मनोजकुमार सिंग याने फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मनोजकुमार सिंग याच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणुक व अपहार केल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना तपासात आढळुन आले आहे. तसेच एका गुह्यात तो जेलमध्ये सुद्धा जाऊन आल्याचे तपासात आढळुन आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT