मुंबई

मुंबईत कोविडची दुसरी लाट, पुढील दोन महिने कोरोनाचा धोका कायम राहणार?

समीर सुर्वे

मुंबई: महिन्याभरात कोविड रुग्णवाढीचा दर 0.28 टक्‍क्‍यांवरुन थेट 1.17 टक्‍क्‍यांवर गेला आहे. एक टक्‍क्‍याच्या पुढे कोणत्याही आजाराची रुग्णवाढ ही वैद्यकिय क्षेत्रात गंभीर मानली जाते. वांद्रे खार पश्‍चिम, चेंबूरपाठोपाठ गोरेगाव या भागातील कोविड वाढीचा दर अधिक आहे. मुंबईत आता कोविडची दुसरी लाट असून पुढील एक ते दिड महिना हा धोका कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी 29 लाख कोविड रुग्णवाढीचा दर 0.28 टक्के होता. तर 27 मार्चरोजी हा दर 1.17 टक्‍क्‍यांवर पोहोचला असल्याचं महानगर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. गेल्या 15 पंधरावड्यात कोविडचे रुग्णवाढीचा दर अधिक वाढला आहे. 

मुंबईतील 24 प्रभागांपैकी फक्त सहा प्रभागातील दर हा 1 टक्‍क्‍या पेक्षा कमी आहे. तर,11 प्रभागातील दर हा 1.26 टक्‍क्‍यांच्या पुढे असून आठ प्रभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍याच्या पुढे आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 6 तारखेलाही मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.30 टक्के होता.तेव्हा के पश्‍चिम अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम या प्रभागातील रुग्णवाढीचा दर हा 0.42 टक्के होता. हा मुंबईतील तेव्हाचा सर्वाधिक दर होता. साथीच्या आजारात रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल तर ती साथ उतरणीला लागली असे मानले जाते.

पहिल्या पाच प्रभागातील रुग्णवाढीचा दर (टक्‍क्‍यांमध्ये)
एच पश्‍चिम (वांद्रे खार पश्‍चिम)--1.65
एम पश्‍चिम (चेंबूर)-1.59
पी दक्षिण (गोरेगाव)-1.55
के पश्‍चिम (अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम )-1.48
ए (घाटकोपर )-1.40

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

second wave covid Mumbai Bandra Khar Chembur followed by Goregaon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

SCROLL FOR NEXT