कोरोना रुग्णांना लपूनछपून विडी-सिगारेट पुरवठा; ठाण्याच्या कोव्हिड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कोरोना रुग्णांना लपूनछपून विडी-सिगारेट पुरवठा; ठाण्याच्या कोव्हिड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार 
मुंबई

कोरोना रुग्णांना लपूनछपून विडी-सिगारेट पुरवठा; ठाण्याच्या कोव्हिड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

दीपक शेलार

ठाणे : कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने शहरात कोव्हिड रुग्णालये उभारली; मात्र बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस रेलचेल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोव्हिड रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सचे (एमएसएफ) जवान सुभाष पाटील यांनी रुग्णाला भेटायला आलेल्या निकटवर्तीयांकडून तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. 

बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून लपूनछपून विडी-सिगारेटसह तंबाखू व गुटखा पुरवला जातो. याची कुणकुण लागताच येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवानांनी तपासणी करून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाची बाधा झाल्यानंतर तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो; मात्र ठाण्यातील कोरोनाग्रस्त या पथ्याला हरताळ फासून स्वतःच स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत गुजरातवरून आलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला होता. 

कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला जेवणाचा डबा किंवा फळांच्या पॅकेटमध्ये लपवून असे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात होते. या पदार्थांमुळे रुग्णाची प्रकृती ढासळू शकते. तेव्हा तूर्तास या सर्वांना ताकीद दिली असून पुन्हा असे प्रकार घडल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल. 
- मंच्छिद्र थोरवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, ठाणे महापालिका.  

-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT