मुंबई : अंबिका निवास चाळीसह येथील २० चाळी सील करण्‍यात आल्‍या. 
मुंबई

कांजूरमार्गमधील हा भाग केला सील, नक्की काय आहे कारण वाचा...

सकाळ वृत्तसेवा

शिवडी : कांजूरमार्ग पूर्व येथील नेहरू नगरमधील अंबिका निवास चाळीत बुधवारी ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णावर पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी दिली. या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ येथील २० चाळींना सील लावले आहेत.

कांजूरमार्ग पूर्व येथील नेहरू नगरमधील अंबिका निवास चाळीत ६५ वर्षीय वयोवृद्ध एकटेच राहतात. त्यांना खानपान देण्यासाठी त्यांचा सहकारी व देखरेखीसाठी मेहुणे त्यांच्या संपर्कात होते. त्यांना २० मार्चपासून सर्दी, खोकला, ताप येत होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते, परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्‍टरांनी त्यांची कोरोनाची तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील दोन्ही सहकाऱ्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. या घटनेनंतर अंबिका निवास चाळीच्या आजूबाजूच्या सुमारे २० चाळींना सील लावण्यात आले आहे. २० चाळींमध्ये सुमारे पाच हजार नागरिक वास्तव्य करतात.

This section in Kanjurmarj is sealed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT