navneet rana and ravi rana sakal
मुंबई

राणा दाम्पत्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

सरकारला आव्हान आणि मुख्यमंत्र्यांना शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सरकारविरोधात आव्हान दिल्याबरोबरच मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता २७ तारखेला सरकारी पक्षाला आपली लेखी बाजू मांडण्यास कोर्टानं सांगितलं आहे. विशेष सरकारी अॅड. वकील प्रदीप घरत यांनी दिली. (Sedition case against Navneet Rana and Ravi Rana)

अॅड. घरत म्हणाले, "सरकारविरोधात त्यांनी द्वेष आणि आव्हान दिलं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते. शांतता राखून त्यांना परतण्याची १२९ कलमांतर्गत पोलिसांनी नोटीस पाठवली होती. पण ही नोटीस झिडकारून त्यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. त्यामुळं राणा दाम्पत्यावर कलम '१२४ अ' अतंर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे" त्यामुळं आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहात तर खासदार नवनीत राणा यांची भायखाळा येथील महिला कारागृहात रवानगी होणार आहे.

राणा दाम्पत्याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आजच त्यांनी जामीन अर्ज देखील कोर्टात दाखल केला. त्यामुळं २९ एप्रिल रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पण तत्पूर्वी २७ तारखेला सरकारला आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडण्यास कोर्टानं सांगितलं आहे, अशी माहितीही यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.

राणा दाम्पत्याविरोधातील गुन्ह्यांची व्याप्ती वाढवली जातेय

दरम्यान, विविध कलमं लावून राणा दाम्पत्यावरील गुन्ह्यांची व्याप्ती वाढवली जात आहे. पण सर्व प्रकाराला कायदेशीररित्या उत्तर दिलं जाईल, असं राणा दाम्पत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT