मुंबई

कंगना राणावतला दिलासा, समन्स बजावण्यास तूर्तास पोलिसांना मनाई

- सुनीता महामुणकर

मुंबई:  वादग्रस्त ट्विट केल्याच्या प्रकरणात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली अभिनेत्री कंगना राणावत विरोधात येत्या 25 जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये आणि समन्सही बजावू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आज दिले. त्यामुळे पुन्हा कंगना आणि तिच्या बहिणीला दिलासा मिळाला आहे.

मुंबई पोलिस आणि पाकव्याप्त काश्मीर बाबतीत ट्विटरवर कंगनाने काही आक्षेपार्ह ट्विट केली आहेत अशी फौजदारी फिर्याद एड यांनी वांद्रे न्यायालयात केली आहे.  ही तक्रार रद्द करण्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीने न्यायालयात याचिका केली आहे. न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. पोलिस या प्रकरणात चौकशी करीत आहे, त्यामुळे त्यांना आणखी तीन दिवस चौकशीला पुन्हा यावे लागेल, असे आज राज्य सरकारकडून एड दिपक ठाकरे यांनी सांगितले. 

कंगना चौकशीला हजर होती. मात्र चौकशी अर्धवट सोडून निघून गेली, ती पोलिसांना सहकार्य करीत नाही असेही पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र ती दोन तास हजर होती. आणखी किती सहकार्य हवे, असा प्रश्न खंडपीठाने केला. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना समन्स बजावू नये असे खंडपीठाने स्पष्ट केले. तोपर्यंत इतर गुन्ह्यांचा तपास पोलिस करु शकतील, असाही शेरा खंडपीठाने मारला.

पोलिसांनी लावलेला राष्ट्रद्रोहाचा आरोपाबाबतही खुलासा हवा, असे आज पुन्हा खंडपीठ म्हणाले. पोलिसांनी भादंवि 124 (अ) नुसार देशद्रोहाचा आरोप कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेलवर ठेवला आहे.

संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कंगना याबाबत सोशल मीडियावर ट्विट करते, त्यामुळे तिला असे करायला मनाई करावी अशी मागणी ठाकरे आणि मूळ तक्रारदार साहिल अश्रफ अली सय्यद यांच्या वतीने एड रिझवान मर्चंट यांनी केली. याबाबत पुढील सुनावणीमध्ये बाजू ऐकू असे खंडपीठाने स्पष्ट केले.

कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत अनेक वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण ट्विट केले आहेत. यामुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिकता बाधित झाली आहे अशी तक्रार सय्यद यांनी केली आहे.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sedition case Bombay High Court extended interim relief Kangana Ranaut Rangoli Chandel

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT