मुंबई

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक 'सेगवे', 'असा' होणार मुंबई पोलिसांना फायदा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिस विभागासाठी उपयुक्त अशा  सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजेच सेगवेचं उद्घाटन गुरूवारी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते मरीन ड्राईव्ह येथे पार पडलं. यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे पोलिस दल दलाचे आत्याधुनिकीकरणाचे काम राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत चौपाटी परिसरात नागरीकांच्या सुरक्षेसाठी सेगवेच्या सहाय्याने गस्त घालण्यात येणार आहे. दरम्यान त्याचंच उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याच्या कोरोनाच्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार असून ते त्या द्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे देशमुख म्हणाले.

मरीन ड्राईव्ह येथे पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील दहा  सेगवे हे वरळी साठी तर पाच नरिमन पॉइंट साठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेगवे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

self balancing electric scooters in the fleet of mumbai police for patrolling

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT