डोंबिवली : रहिवासी सोसायटीत भाजी खरेदीसाठी लागलेली रांग  
मुंबई

डोंबिवलीत सोसायट्यांमध्ये स्वयंशिस्तीचे पालन 

शर्मिला वाळुंज

ठाणे : डोंबिवलीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतानादेखील नागरिक खोटेनाटे कारण सांगून बाहेर बिनधास्त फिरतानाचे चित्र एकीकडे दिसत असले, तरी दुसरीकडे डोंबिवलीतील काही सोसायट्यांनी मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोसायट्या स्वतः सील करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी केवळ काही तासांची मुभा देऊन इतर वेळेस सोसायट्यांचे गेट लॉक केले जात असून कोणालाही विनाकारण बाहेर फिरण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच दूध, भाजीची गाडी सोसायटीच्या दारात येत असल्याने नागरिकही या स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन करताना दिसत आहे. 

डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक परिसर सील केले असतानादेखील नागरिकांमध्ये त्याविषयी गांर्भिय नसून काहीजण डॉक्‍टरच्या औषधांची जुनी पावती दाखवून मेडीकलसाठी बाहेर जात आहेत. भाजीपाला आणण्यासाठी एकाच घरातील दोन-तीन व्यक्ती बाहेर पडत आहेत, घरात कंटाळा आला म्हणून दूधाचे किंवा भाजीचे कारण सांगून परिसरात पाय मोकळे करणारेही काही महाभाग आहेत. प्रत्येकाला अडवणे पोलिसांना शक्‍य नसल्याने नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर नियंत्रण आणण्यात अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे काही प्रभागातील सोसायट्यांनी डोंबिवलीकरांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

गोग्रासवाडी, जिजाईनगर परिसरातील सोसायट्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत संचारबंदीदरम्यान योग्य ते नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या सूचनांनुसार त्यांना अत्यावश्‍यक सेवा सोसायटीच्या दारात मिळवून देण्याची सोय केल्याने नागरिक नियमांचे काटेकोर पालन करताना दिसतात.

येथील जिजाईनगर परिसरातील अनेक सोसायट्यांनी स्वतःच गेटला टाळे ठोकले आहे. अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना सकाळी व सायंकाळी एक ते दोन तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तसेच भाजीपाल्याचीही एक गाडी लोकप्रतिनिधींना सांगून निश्‍चित केली आहे. हा भाजीपाला विक्रेता एक दिवसाआड प्रभागात येतो. प्रत्येक सोसायटीला वेळ ठरवून देण्यात आली असून योग्य ते अंतर राखून नागरिकही अत्यावश्‍यक असल्यास भाजी खरेदी करत आहेत. 

    आमच्या सोसायटीमध्ये साधारण 78 खोल्या आहेत. कोरोनाचा फैलाव डोंबिवलीत पहाता आम्ही स्वतःच सोसायटीच्या गेटला टाळे लावले आहे. सकाळी 10 ते 12 व सायंकाळी 6 ते 7 ही वेळ नागरिकांना ठरवून दिली असून त्या वेळेत त्यांना मेडीकल किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर जाता येईल. तसेच नगरसेविका सायली विचारे यांच्याशी बोलून त्यांनी सोसायट्यांना एक भाजीवाला नेमून दिला आहे. प्रत्येक सोसायटीला एक तासाची वेळ दिली असून त्या वेळेत तो भाजीविक्रेता एक दिवस आड सोसायटीच्या गेटवर येतो. 
- मंगेश सुर्वे, सेक्रेटरी,
श्री अनुपम सोसायटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs WI, T20I: श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! रोहित-सूर्यालाही जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलंय

आजचे राशिभविष्य - 07 सप्टेंबर 2026

Egg Recipe: अंडे, चीज अन् क्रीमी सॉसची भन्नाट मेजवानी; १० मिनिटांत बनवा व्हायरल 'कोरियन एग ड्रॉप सँडविच'!

National Pickleball Championship 2026: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कोचीमध्ये वर्चस्व! सर्व श्रेणींमध्ये मिळवले संघ अजिंक्यपद!

SCROLL FOR NEXT