senior citizen died after beaten in local train police arrested suspect mumbai esakal
मुंबई

Mumbai Crime News : लोकलमध्ये प्रवाशाच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला केली अटक

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बबन हांडे - देशमुख (वय 65) असे मयत प्रवाशाचे नाव आहे.

आंबिवली येथे राहणारे बबन हांडे देशमुख हे गुरुवारी दुपारी काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळा लोकलने घरी चालले होते. सामान्य डब्यात गर्दी असल्याने बबन लोकल मधील मालवाहतूक डब्यात चढले. लोकलमध्ये चढत असताना त्यांचा धक्का एका प्रवाशाला लागला.

याबद्दल बबन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या प्रवाशाने बबन यांना मालवाहतूक डब्यात बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकल धावती असल्याने इतर डब्यातील प्रवाशांना माल वाहतूक डब्यात काय चालले हे कळले नाही. बेदम मारहाण झाल्याने बबन यांचा जागीच मृत्यू झाला.

मारेकरी टिटवाळा स्थानक येण्यापूर्वीच लोकलमधून उतरुन पळून गेला. टिटवाळा रेल्वे स्थानकात माल वाहतूक डब्यात एक व्यक्ति मरण पावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी बबन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT