jyotsna mohile.
jyotsna mohile. 
मुंबई

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. जोत्स्ना मोहिले अनंतात विलीन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : 'सोहम हर डमरू बाजे' या नाट्यपदाच्या गायिका, 'संगीत मंदारमाला' या नाटकातील अभिनेत्री तथा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. ज्योत्स्ना मोहिले (82) यांचे हृदयविकाराने ओमान येथे 12 मे रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. 14) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. 

जयपूर, ग्वाल्हेर घराण्यांच्या गायिका आणि निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या शिष्या असलेल्या ज्योत्स्ना मोहिले यांनी भारतीय विद्याभवनातर्फे देशभरात शास्त्रीय संगीताच्या मैफली केल्या. त्यांना 1950 मध्ये अखिल भारतीय युवा महोत्सवात उपशास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यांनी 1950 ते 1960 या दशकात भगिनी सुलभा मोहिले-वैद्य यांच्यासोबत गाणी गायली. ही बहिणींची जोडी शास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होती. त्यांनी `संगीत मानापमान', `संगीत सौभद्र', 'संगीत मंदरमाला', 'संत सखू', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक मराठी संगीत नाटकांत काम केले. `आज आपुल्या प्रथम प्रीतीचा', 'जायचे इथून दूर', 'किती पांडुरंगा वाहू', 'आधार जीवा 'आदी अनेक नाट्यपदे त्यांनी गायली आहेत. 

ज्योत्स्ना मोहिले यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली व संगीत विषयात पीएच.डी. केली. त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात संगीताच्या प्राध्यपक म्हणून काम केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत या ज्योत्स्ना मोहिले यांच्या शिष्या आहेत. ज्योत्स्ना मोहिले यांच्या मराठी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळाने 2001 मध्ये न्यू यॉर्क येथे त्यांच्या शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित केली होती. त्यांना राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओमान येथे त्या मुलासोबत राहत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT