मुंबई

"सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतही काम करत नाही", अनिल परबांचे मनसेवर गंभीर आरोप

समीर सुर्वे

मुंबई, ता. २३ : सुपारी घेतल्या शिवाय मनसे कोणतही काम करत नाही. त्यांचे अस्तित्व त्यावरच आहे. अशा शब्दात परीवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलांविरोधात छेडलेल्या आंदोलनावरुन ऍड. अनिल परब यांनी या हा हल्ला चढवला आहे. 

अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना भारतीय  पक्षांचाही चांगलाच समाचार घेतला. सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपला पाच वर्ष काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचा स्वप्न भंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरू नये म्हणून त्यांना हे बोलावे लागते असा टोलाही त्यांनी भरतोय जनता पक्षाला लगावला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्‍तव्याचाही समाचार अनिल परब यांनी घेतला. "शरद पवार कोठे, त्यांचे कर्तृत्व काय, कुठे आणि पडळकर कोठे. कोणावरीही टिका करताना स्वत:कडे पाहावे. वयाच्या 36 व्या वर्षी पवार यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. हे असे बोलणारे भाजपच्या संस्कारातले नाही. ही भेसळ आहे. ओरिजनल भाजपमधील असे बोलणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

कठोर निर्णय घ्यावे लागतील 

पुन्हा लॉकडाऊन करावे या मताचे सरकार नाही. पण सध्याची परीस्थीती नियंत्रणा बाहेर जात असेल तर सरकारलाही काही कठोर निर्णय घ्यावे लागतीलच. रुग्णसंख्या कमी असली तरी कोविडचे रुग्णालय बंद न करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. दळणवळण साधनांवर निर्बंध घालण्याबाबत पुढच्या पंधरावड्यात आकडेवारी पाहून निर्णय घेण्यात येईल असेही ऍड. अनिल परब यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

serious allegations by minister anil parab on MNS read what parad said

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT