Regional Transport Officer sakal
मुंबई

Mumbai News : परिवहन विभागात कोट्यावधींच्या दंडाच्या रकमेत सेटलमेंन्टचा प्रयत्न ?

करारानुसार कारवाई केलेल्या दंडाची रक्कम कोट्यावधींच्या घरात; आयुक्त कार्यालय म्हणतात ६०-७० लाखांचाच दंड

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरटीओ कार्यालयातील आरसी प्रिटींगचे कंत्राट असलेल्या रोजमार्टा कंपनीला राज्य परिवहन विभागातील राज्यभरातील ५० आरटीओ कार्यालयांतर्गत एकूण कोट्यावधींचा दंड केला आहे. मात्र, कंत्राट संपल्यानंतर आता दंडाची रक्कम वसूल करतांना अचानक दंडाची रक्कम लाखांच्या घरात असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामूळे दंडाच्या रक्कमेत सेटलमेंटचे पाणी मुरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये आरसी प्रिटींगचे कंत्राट २०१७ मध्ये रोजमार्टा कंपनीला दिले होते. करारामध्ये प्रत्येक आरटीओ कार्यालयांमध्ये आरसी प्रिटींगला उशीर झाल्यास, तुटवडा पडल्यास, साहित्य, साॅफ्टवेअर, हार्डवेअरचा पुरवठा न केल्यास त्याशिवाय कंत्राट करारातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास दैनंदिन दंडाची तरतुद केली होती.

त्यानुसार गेल्या सात वर्षात ५० आरटीओ कार्यालयाने वेळोवेळी रोजमार्टा कंपनीला दंड केला आहे. त्यानुसार एकूण दंडाची रक्कम तब्ब्ल कोट्यावधींच्या घरात पोहचली आहे. परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार दंडाच्या रक्कमेचा आकडा मोठा असल्याचे सांगितले आहे.

२०१७ नंतर रोजमार्टा कंपनीचे कंत्राटाची मुदत संपली असतांनाही, परिवहन विभागाने वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. तत्कालीन परिवहन मंत्र्यानी सुद्दा रोजमार्टा कंपनीच्या अनागोंदी कारभाराची दखल घेतली होती. तर नविन निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सुचना सुद्धा दिल्या होत्या.

त्यानतंर आता सात वर्षानंतर कर्नाटक येथील मनिपाल कार्ड टेक्नाॅलाॅजी कंपनीला आरसी प्रिटींगचे काम दिले आहे. त्यामूळेच रोजमार्टा कंपनीचा एकूण जमा खर्चाचा हिशोब सुरू असून, दंडाच्या रक्कमेची वसूली सुद्धा परिवहन विभागाकडून केली जाणार आहे. यानिमीत्तानेच दंडाचे आकडे पुढे आले असून, कोट्यावधींचा दंड आणि लाखांची वसूली करण्याचा प्रयत्न परिवहन विभागाचा असल्याची शक्यता परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने वर्तवली आहे.

दंड माफ करण्याचा अधिकार सरकार आणि आयुक्तांना आहे. मात्र, अद्याप माझ्यापुढे गेल्या एक वर्षात अजूनही दंडमाफी फाईल आली नाही. त्यापूर्वीचे काही दंडाच्या घटना असल्यास त्याची चौकशी करतो. सध्या कंपनीचे कंत्राट संपले आहे. कंपनीचे फायनल पेमेंट बाकी आहे. डीपॉजीट, बँक गॅरंटी रक्कम अद्यापही आपल्याकडेच आहे. त्यामुळे सबंधित प्रकरणाची चौकशी करावी लागेल.

- विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT