bike robbery sakal
मुंबई

भिवंडी : घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल; ७ जणांना अटक

सकाल वृत्तसेवा

भिवंडी : शहरात वाढणाऱ्या घरफोड्या आणि वाहनचोरी (vehicle robbery) रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पोलिस उपायुक्त यांनी त्यांच्या आदेशानुसार शांतिनगर पोलिस ठाण्याचे (Shanti nagar police station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने शहरात घडलेल्या घरफोडी व वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून (seven culprit arrested) त्यांच्याकडून ३ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच वाहन चोरीतील एक लाख ८५ हजार रुपये किमतीची वाहने असा एकूण पाच लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (robbed property seized) केला आहे.

शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११० ग्रॅम वजनाचे तीन लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने, एक रिक्षा, तीन मोटरसायकल, १५०० रुपये किमतीचे पितळी रॉड, तर १७ हजार रुपये किमतीचे ट्रॅक पँटचे अशा सात चोरीचे गुन्हे, तर भिवंडी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा व एक मोटरसायकल अशा दोन गुन्ह्यांचे उकल शहर व शांतिनगर पोलिसांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

SCROLL FOR NEXT