infant  
मुंबई

७ महिन्याचं बाळ: कोरोना आणि फुफ्फुसातील ट्युमरवर मात

मुंबईतील वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: अवघ्या सात महिन्याच्या बाळाला (Seven month child) कोविड 19 (corona)संक्रमणाची लागण तसेच बाळाच्या (infant) छातीमध्ये 15 सेमी आकाराचा दुर्मिळ ट्यूमर (tumer)आढळून आला. या बाळावर परेल येथील वाडिया हॉस्पीटलमध्ये यशस्वी उपचार करून एक नवं आयुष्य दिले आहे.बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील दांपत्याच्या घरी बाळाचा जन्म झाल्याने ते खुप आनंदी होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. बाळ दोन महिन्याचे झाले असतांना बाळाचे सततचे रडणे, श्वासोच्छवासात अडचणी येणे आदी समस्या सुरू झाल्या. (Seven month child sucessfully beat corona & tumer)

हळूहळू बाळाची तब्येत ढासळत गेली. स्तनपानातही बाळाला अडचणी येऊ लागल्या, अन्न गिळण्यासाठी होणारा त्रास या सा-यामुळे बाळ अशक्त होऊ लागले.  चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी वेगवेगळ्या स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला ज्यांनी मुलाला टेराटोमा नावा दुर्मिळ ट्युमर असल्याचे निदान केले.  बाळाच्या पालकांनी या बाळाला परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन येथे पुढील उपचारांसाठी दाखल केले.

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलच्या प्रोफेसर आणि शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की,  15  एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केल्यावर तपासणीअंती या बाळाला टेराटोमा नावाचा ट्युमर असल्याचे आढळून आले. सर्वात प्रथम आम्ही कोविड चाचणी केली ती सकारात्मक आल्यानंतर बाळाला आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर जेव्हा पुन्हा चाचणी करुन ती नकारात्मक आली तेव्हा त्या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बाळ श्वास घेण्यास घाबरत होते, स्तनपान स्वीकारू शकला नव्हते. बाळाची दोन्ही फुफ्फुसे, हृदयाच्या काही भाग आणि शरीरातील सर्वात मोठी धमनी या सा-यांवर ट्युमरमुळे गंभीर परिणाम झाल्याचे सीटी स्कॅन चाचणीत दिसून आले.

आमच्या मुलाच्या जन्मानंतर, त्याला श्वास घेता येत नाही म्हणून तो रडताना पाहून आम्ही खुप घाबरलो होतो. बाळाला ट्यूमर झाल्याचे निदान झाल्यावर आम्ही स्तब्ध झाले. आमच्यासाठी हा एक सर्वात मोठा धक्का होता. बाळाला वेदना होत असल्याचे बघवत नव्हते. स्थानिक डॉक्टरांनी माझ्या मुलावर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे आम्ही खचून गेलो होतो. सुदैवाने माझ्या मुलावर वाडिया रुग्णालयात वेळेवर उपचार झाल्याने माझे बाळ वाचले अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या पालकांनी व्यक्त केली.

“या बाळाला असह्य वेदना होत होत्या आणि आम्ही प्रथम या बाळाला कोविडमुक्त करण्याचा निर्णय घेतला कारण कोविड संक्रमणामुळे हे बाळ श्वास घेऊ शकत नव्हते आणि त्यानंतर ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली" असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT